नवीन वर्षासाठी उत्तम भेट!; एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

इंडियन ऑइलने नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही ही जनतेसाठी दिलासादायक बाब होती. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळाला आहे.

नवीन वर्षात गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. ही कपात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरवर करण्यात आली आहे. आयओसीएलच्या मते, १ जानेवारी २०२२ पासून मुंबईतील व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्तने कमी होऊन १९४८.५० पर्यंत खाली आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईकरांना १९ किलोच्या गॅस सिलेंडरसाठी २०५१ रुपये मोजावे लागत होते. चेन्नईत आता १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी २१३१ रुपये, दिल्लीत १९९८.५ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन किंमती जाहीर झाल्यानंतर, कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर आता आजपासून २०७६ रुपयांना खरेदी करता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *