नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज !

मागील आठवडय़ापासून महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं महाबळेश्वर पर्यटकांनी बहरलं आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी याठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या  आहेत. दरम्यान एकीकडे हे पर्यटनस्थळ गजबजू लागले असतानाच राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने र्निबधाचे सावटही इथे पसरले आहे. सध्या करोनाचे नियम पाळून पर्यटक आणि व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही  तास शिल्लक राहिले  आहेत. नववर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. याच पार्श्वभूमीवर  महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणार महाबळेश्वर पर्यटकांनी बहरलं आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी याठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. तसेच नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात जत्रेचं स्वरूप आलेले पाहायला मिळत आहे.

दरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने नियमांचे पालन करण्याचे आदेश बजावले आहेत.  ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. जे हॉटेल, रेस्टॉरंट करोना नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर पोलीस विभागाने  कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. दरम्यान, महाबळेश्वरच्या वनविभागाच्या हद्दीतील खासगी बंगले, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये रात्री कोणतीही पार्टी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बंदिस्त जागेत पन्नास टक्के आणि खुल्या जागेत पंचवीस टक्के उपस्थितीत नववर्षांचे कार्यक्रम करता येतील. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना, फटाके फोडण्यास, मद्य पिऊन गाडी चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *