‘बचपन का प्यार’ या गाण्यातील प्रसिध्द कलाकार सहदेव दिरदो मंगळवारी आपल्या मित्रांसोबत प्रवासादरम्यान अपघातात गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवर विना हेल्मेट प्रवास करत असल्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे. शबरी नगरीकडे जाताना मातीतून त्याची गाडी घसरली व हा अपघात घडला. तेथील स्थानिक लोकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र नंतर खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालु आहेत.
प्रसिध्द रॅपर बादशहानेही सहदेवसोबत ‘बचपन का प्यार’ हे गाणे गायले होते. सहदेव दिरदो हा ‘बचपन का प्यार’ या गाण्यामुळे फेमस कलाकार बनला होता.
