निहार ठाकरे आणि अंकिता पाटील अडकले लग्नबंधनात; मुंबईत पार पडला शाही विवाह सोहळा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे आणि भाजपाचे नेते आणि राज्यामधील माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा विवाह सोहळा मुंबईत पार पडला. मुंबईच्या ताज पॅलेसमध्ये झालेल्या या विवाहसोहळ्यात राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती. गेल्या अनेक दिवसांपासून अंकिता आणि निहारच्या लग्नाची चर्चा होती. या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सपत्निक हजेरी लावली आणि वधु-वरांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी या विवाहाचे फोटो शेअर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *