शोरूम फोडून तीन लाखांचे कपडे चोरी

सीताबर्डीतील कोष्टीपुरा येथील झूम कलेक्शन फोडून चोरट्यांनी तीन लाखांचे कपडे घेऊन पोबारा केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अजहर अहमद असरार अहमद खान (वय ३६, रा. प्रशांतनगर) यांच्या मालकीचे हे शोरूम आहे. शनिवारी मध्यरात्री शटर वाकवून चोरटे दुकानात घुसले. काउंटरमधील २५ हजारांची रोख, शर्ट, जीन्स, टी-शर्ट व जॅकेट घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करीत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *