राज्यातील या जिल्ह्यातील विद्यालयात कोरोनाचा विस्फोट , 52 जण पॉझिटिव्ह

देशासह महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत आहे. त्याच दरम्यान नगरमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर मधील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील कोरोना रूग्णांची संख्या 52 इतकी झाली आहे.

नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नवोदय विद्यालय परिसर कॅन्टोनमेंट झोन जाहीर केला. 3 दिवसांपूर्वी 19 जण कोरोना बाधित झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली, यात आणखी 32 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

नवोदय विद्यालयामध्ये 460 विद्यार्थी आणि 51 शिक्षक आणि कर्मचारी आहेत. सध्या 307 विद्यार्थी या ठिकाणी निवासी आहेत. तर 48 कोरोना बाधीत विद्यार्थ्यांना उपचारासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *