मुलीला पळवून नेल्याचा कुटुंबीयांना राग अनावर, मुलाचे छाटले प्रायव्हेट पार्ट

मुलीला पळवून नेणं तरूणाच्या जीवावर बेतलंय. कुटुंबीयांचा राग अनावर झाल्यामुळे एक मोठी दुर्घटना घडली आहे. आरोपीने आपल्या कुटुंबातील मुलगी पळवून नेली. ही गोष्ट कुटुंबीयांना न पचणारी होती. या रागात कुटुंबियांनी तरूणाला किडनॅप करून त्याचा प्रायव्हेट पार्ट काढून फेकलं. पोलिसांना हा माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळा धाव घेतली. तरूणाला रूग्णालयात दाखल केलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

कुठे घडला हा प्रकार? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा एका प्रवाशाने सागरपूर परिसरात एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तरुणाला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

तरुणाच्या जबाबानुसार पोलिसांनी अपहरण, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला अशा आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच या प्रकरणातील काही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित तरुण कुटुंबासोबत रघुवीर नगरमध्ये राहतो. त्याचे सागरपूर येथील एका २० वर्षीय तरुणीशी सुमारे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही घरच्यांना लग्नासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिला.

यानंतर तरुण आणि तरुणी 21 डिसेंबरला घरातून पळून जयपूरला पोहोचले. तिथे दोघांनी मंदिरात लग्न केले. लग्नानंतर दोघे 22 डिसेंबरला दिल्लीला पोहोचले आणि राजौरी गार्डन परिसरात राहिले.

राजौरी गार्डनमध्ये मुलीची उपस्थिती असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी राजौरी गार्डन गाठले आणि दोघांनाही सोबत घेऊन सागरपूरला गेले. तेथे तरुणावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर तरुणाला दुसऱ्या ठिकाणी नेऊन धारदार शस्त्राने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाला सागरपूरजवळील जंगलात फेकून दिले.

याप्रकरणी तरुणीचा जबाबही नोंदवण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आरोपी बाजूच्या काही लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *