गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे सावट कमी झाले आहे. मात्र, आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे ओमायक्रॉनचा प्रसार वाढत चालला आहे. संपूर्ण जगात ओमायक्रॉनचे थैमान पसरले असताना आता ठाण्यातही ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्याची चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची कुटुंबीयांचे देखील नमुने ओमायक्रोन चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, त्याच्या घरच्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
परराज्यात गेल्या महिन्यांपासून ओमायाक्रॉनचे थैमान सुरु आहे. भारतात कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर आता सगळीकडे शिथिल वातावरण झालेले पाहायला मिळाले आहे. मात्र, गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेला महाराष्ट्रातील पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आल्यानंतर सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आता आज ठाण्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरलेले पाहायला मिळाले आहे. ही व्यक्ती पश्चिम आफ्रिकेतील घाना येथून १४ डिसेंबर रोजी भारतात परतली होती. तेथून आल्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली होती. या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या ओमायक्रॉनचे नमुने हे पुणे येथे ओमायक्रॉनच्या तपासासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज त्याचा अहवाल आला आहे. या अहवालात या रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
ठाण्यातील ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांचा अहवाल देखील ओमायक्रोन चाचणीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, रुग्णाच्या कुटुंबीयांचे अहवाल निगेटिव्ह आले
