सर्वात महागडा घटस्फोट

ब्रिटनमधील एका न्यायालयानं (British Court) मंगळवारी दुबईतील एका शासकाला Ex Wife आणि मुलांच्या पुढील आयुष्यासाठी एकदोन नव्हे तर, तब्बल 55 कोटी पाऊंड (5525 कोटी रुपये) इतकी भरपाई देण्याचा आदेश दिला. ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळासाठी चाललेला घटस्फोटाचा खटला म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम (Mohammed bin Rashid Al Maktoum) यांना त्यांची सहावी पत्नी, राजकुमारी हया बिंत अल हुसैन यांना 25.15 कोटी पाऊंड इतकी रक्कम पोटगी स्वरुपात द्यावी लागणार आहे.

14 वर्षी अल जलीला आणि 9 वर्षीय जायद यांच्यासाठी शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांना 29 कोटी पाऊंडचं बँक गँरंटीसह भरपाई द्यावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *