महिलेचा अवैध संबंध ठेवण्यास नकार, संतापलेल्या तरुणानं तिच्या ६ वर्षाच्या मुलाची केली हत्या

एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल आणि त्या व्यक्तीने प्रेमाला नकार दिल्यानंतर स्वतःचं बरंवाईट केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. किंवा त्या व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीला त्रास दिल्याच्याही अनेक घटना घडत असतात. मात्र, एका विवाहितेनं तरुणाला नकार दिल्यानंतर त्या माथेफिरूने महिलेच्या सहा वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील बरवानी मध्ये ही एका तरुणाने एका महिलेच्या ६ वर्षाच्या मुलाची हत्या केली. या महिलेनं त्याच्याशी अवैध संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर तरुणाने हे कृत्य केलं, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस अधीक्षक दीपक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, “शनिवारी एका व्यक्तीने तो आणि त्याची पत्नी दोघंही कामावरून घरी परतल्यानंतर त्यांचा ६ वर्षांचा मुलगा सापडत नसून तो बेपत्ता आहे, अशी तक्रार केली होती. शेजाऱ्यांनी बेपत्ता मुलाला शेवटचे दिनेश भिलाला उर्फ नाना (२१) सोबत शेतात जाताना पाहिले होते. त्यानंतर पोलिसांनी दिनेशला २४ तासांच्या आत नायदाद येथून ताब्यात घेतलं. मृत मुलाच्या आईने आपल्यासोबत संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आपण त्याला मारहाण करत हत्या केली, अशी कबुली आरोपीने दिली.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *