संतापजनक! तीन मुलांचा बाप, तरी लहान मुलांवर करायचा लैंगिक अत्याचार

जिल्ह्यातील गंगापूरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून एका अकरा वर्षीय गतिमंद मुलावर एका नराधमांन लैंगिक अत्याचार केल्याचं किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपीने यापूर्वी सुद्धा असे गैरप्रकार केले होते.

याप्रकरणी गंगापूर पोलीसात अब्दुल बागवान याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी बागवान यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली आहे. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

यापूर्वी सुद्धा केले गैरप्रकार

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल बागवान तीन मुलांचा बाप आहे. तर यापूर्वी सुद्धा त्याने असेच काही गैरप्रकार केले होते. परंतु नागरिकांनी त्याला समज देत सोडून दिले होते. पण अब्दुल बागवान याने पुन्हा अत्याचार केल्याचं समोर आल्याने नागरिकांनी त्याला चोप देत, पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *