नाद नाय करायचा! कोल्हापूरच्या लीना नायर यांच्याकडे फ्रान्समधील कंपनीचं नेतृत्व

काही दिवसांपूर्वी भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांच्याकडे ट्विटरची कमान सोपविण्यात आली, त्यामुळे जगभरात भारताची मान आणखी उंचावली गेली. त्यानंतर आता भारतीय वंशाच्या लीना नायर यांची लंडनमधील फ्रेंच लक्झरी समूह शनेलने ग्लोबल सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. आतापर्यंत त्या युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) होत्या, पण आता त्यांनी राजीनामा दिला आहे. लीना नायर जानेवारीपासून म्हणजेच नवीन वर्षापासून या ग्रुपमध्ये सामील होणार असल्याचे शनेलकडून सांगण्यात आले आहे.

XLRI च्या सुवर्णपदक विजेत्या आहेत लीना नायर
भारतीय वंशाच्या लीना नायर यांची ग्लोबल कंझ्युमर गुड्स कंपनीत जवळपास ३० वर्षांची कारकीर्द राहिली आहे. लीना नायर यांनी झारखंडमधील जमशेदपूर येथील झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट (XLRI) येथे शिक्षण (१९९०-९२) घेतले. तेथे त्यांनी सुवर्णपदकही जिंकले होते. त्याला अनेक एचआर एंटरवेंशनसाठी श्रेय मिळाले आहे. त्यापैकी एक आहे ‘करिअर बाय चॉईस’. ज्यांनी आपले करिअर सोडून दिले आहे, अशा महिलांना वर्कफोर्सचा एक भाग बनवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

लीना नायर या मूळच्या कोल्हापूरच्या
महाराष्ट्रातील कोल्हापूर हे लीना नायर यांचे मूळ गाव. त्याचे शालेय शिक्षणही कोल्हापूरच्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले. जमशेदपूरच्या झेवियर्स कॉलेजमधून त्यांना ऑफर आली, तेव्हा त्यांच्या घरच्यांना पटवणे हे खूप कठीण काम होते. जमशेदपूरला शिक्षणासाठी जायचे आहे, आणि तिकडे जाण्यासाठी रेल्वेने पोहोचायला सुमारे ४८ तास लागतात, हे वडिलांना पटवून देण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
२०१३ मध्ये लंडनला गेल्या
१९६९ मध्ये जन्मलेल्या लीना नायर २०१३ मध्ये भारतातून लंडनला गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना अँग्लो-डच कंपनीच्या लंडन मुख्यालयात नेतृत्व आणि संघटना विकासाच्या जागतिक उपाध्यक्ष बनवण्यात आले. २०१६ मध्ये त्या युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण सीएचआरओ (CHRO) बनल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *