संशयाची पाल चुकचुकली आणि मुलानं थेट बापालाच संपवलं

संशय हा किती वाईट असतो पण त्याचा अतिरेक आणि त्यातून होणारे वाद त्याचे परिणाम वाईट असतात. कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी येत आहे. संशयातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

वडिलांचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलाने बापाची हत्या केली आहे. पन्हाळा तालुक्यातील मालेगावात उघडकीस आली आहे. भिकाजी वगरे असं मृताच नाव आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी मुलगा अजित याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून घरात वारंवार वाद होत होते.हा वाद टोकाला पोहोचला. रागातून वडील आईला मारहाण करत असताना आरोपी अजितने पाहिले. त्यांनतर रागात अजितने वडिलांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारून हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *