कपडे दाखवण्यात गुंतवून असा केला महिलेचा मोबाईल आणि हेडफोन लंपास; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

कपडे दाखवण्यात गुंतवून दोन चोरट्यांनी मोबाईल आणि हेडफोन लंपास केल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. तर दुसरीकडे उल्हासनगरमध्ये एका व्यापाऱ्याच्या दुकानातील पैशाची बॅग आणि महत्त्वाचे कागदपत्र चोरी केल्याची घटना हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ह्या दोन्ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या मुख्य बाजारात आनंद कलेक्शन नावाचे कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी दोन चोरट्यांनी दुकानात येऊन कपडे दाखवण्यास सांगितले आणि कपडे दाखवण्यात गुंतवून या दोन चोरट्यांनी अलगत गल्ल्यात हात घालून मोबाईल फोन आणि हेडफोन लंपास केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.आता याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोन चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहे.

तर दुसरीकडे उल्हासनगर मध्ये कॅम्प पाच परिसरात किराणा दुकान आहे.एका चोरट्याने भर दुपारी त्यांच्या दुकानात शिरून पैशाची बॅग आणि महत्वाचे कागदपत्र घेऊन पसार झाला. त्या बॅगमध्ये 31 हजार रुपये आणि बँकेचे चेक आणि महत्वाचे कागदपत्रे होती.ही चोरी पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेला २० दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत असून चोरट्याला जेरबंद करण्याची मागणी व्यापारी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *