इंद्राणीच्या पोलिस कोठडीत वाढ

शीना बोरा हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्याम राय या तिघांना सोमवारी मुंबईतील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने तिन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करत पाच सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. इंद्राणीवर पोटची मुलगी असलेल्या शीनच्या हत्येचा आरोप आहे.

संजीव खन्ना इंद्राणीचा दुसरा पती तर, श्याम राय तिच्या गाडीचा चालक होता. २०१२ मध्ये तिघांनी मिळून शीनाची हत्या करुन तिचा मृतदेह रायगडच्या जंगलात जाळला होता.

एका वाहिनीची साईओ राहिलेल्या इंद्राणी स्टार इंडिय़ाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी आहे. मुंबई पोलिसांनी इंद्राणीला २५ ऑगस्ट रोजी अटक केली होती. तेव्हापासून या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहे.

आधी शीना इंद्राणीची बहिण असल्याची माहिती समोर आली होती. संपत्तीच्या वादातून तिची हत्या झाल्याचे बोलले जात होते. मात्र तपासाने वेग घेतल्यानंतर शीना इंद्राणीची बहिण नसून, मुलगी असल्याची माहिती समोर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *