पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे १ सप्टेंबरपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार असल्याचं कळतंय.

२ ते ३ रुपयांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी १५ ऑगस्टला पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्या होत्या. दिल्लीत पेट्रोल १.२७ रुपयांनी आणि डिझेल १.१७ रुपयांनी स्वस्त झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *