दोन अपघातात पाच ठार, एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला

कार आणि दुचाकीमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा अपघात नाशिक – देवळा रोडवरील रामेश्वर फाट्याच्या हॉटेल दुर्गाजवळ घडला.

शेतातील काम आटोपून पती पत्नीसह मुलगा आणि मुलगी एकाच मोटारसायकलवरून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरी परतत असताना हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चार वाहनांचा विचित्र अपघात

दरम्यान, दुसऱ्या एका अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झालेत. मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या 4 वाहनांच्या अपघातात 1 जण जागीच ठार झाला  तर 5 जण जखमी झालेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एक ट्रक आणि तीन चारचाकी वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *