मुंबईच्या विलेपार्लेतील मॉलला आग

मुंबईतील एका मॉलला भीषण आग लागली आहे. विलेपार्लेमधील प्राईम मॉलला ही आग लागल्याची माहिती आहे. दरम्यान मॉलला ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. याशिवाय 8 पाण्याचे टँकरही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहेत.

लेवल 4ची ही आग असल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट झाले आहेत. आगीत कोणी जखमी झालंय का याची माहिती अजून मिळालेली नाही.

गुरुवारी ऑटोमोबाईल कंपनीला आग

गुरुवारी मुंबईतील पवई परिसरात आग लागली होती. एका ऑटोमोबाईल कंपनीला आग लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *