पोलीस कोठडीत मृत्यू : २० वर्षांत १८८८ मृत्यू, केवळ २६ दोषी पोलिसांना शिक्षा

२० वर्षांत पोलीस कोठडीत तब्बल १८८८ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. अधिकृत आकड्यानुसार, या प्रकरणांत वेगवेगळ्या राज्यांतील ८९३ पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. यातील ३५८ जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली. परंतु, गेल्या २० वर्षांत पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी केवळ २६ पोलीस कर्मचाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’द्वारे तयार करण्यात आलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *