राजस्थान उच्च न्यायालयाने जैन समाजातील संथारा व्रतावर घातलेली बंदी उठवित सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) राजस्थान उच्च न्यायालय व केंद्र सरकारला नोटीस पाठविली आहे.
राजस्थानच्या उच्च न्यायालयाने संथारा व्रतावर घातलेल्या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होताना न्यायालयाने बंदी उठविण्याचा निर्णय घेतला व राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.
जैन समाजामध्ये “संथारा व्रत‘ केले जाते. या व्रतामध्ये स्वयंप्रेरणेने मृत्यूपर्यंत उपवास करण्यात येतो. या व्रताला विश्व हिंदू परिषदेने समर्थन दर्शविले आहे. “संथारा म्हणजे जैन-मुनींकडून आत्महत्या करण्याचा प्रकार नव्हता आणि नाही. सध्याच्या जीवनातून मोक्ष मिळवून पुनर्जन्म मिळावा असा त्याचा अर्थ असून हे व्रत 2500 वर्षांपासून सुरु आहे‘ असे मत विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष नरपत सिंह शेखावत यांनी व्यक्त केले होते.
