लोकल ही मुंबईची धावती नस आहे. ज्यामुळे कोणताही व्यक्ती मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करु शकतो. सध्या कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. परंतु तरी देखील लाखो लोक आज लोकलने प्रवास करत आहेत. महिला देखील कामावर जाण्यासाठी लोकलचा उपयोग करताता आणि दररोज यातून प्रवास करतात. परंतु महिलांसंदर्भात अशा बातम्या समोर येऊ लागल्या आहेत की, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जात आहेत.
लोकलमध्ये घडत असलेली सगळी प्रकरणे पाहाता रेल्वेने महिलांसाठी सुरक्षेची काळजी घेतली, ज्यासाठी फोननंबर, महिला डब्यात पोलिस आणि सीसीटीव्ही सारख्या गोष्टींचा अवलंब केला गेला, ज्यामुळे ही प्रकरणे कमी झाली असली तरी, त्याला संपूर्णपणे आळा बसलेला नाही.
एक रेल्वे लोकल संदर्भात अशी बातमी समोर आली आहे, जी वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात तर जाईल, याशिवाय या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले जात आहेत.
समोर आलेल्या माहितीमध्ये असे सांगितले जात आहे की, एक नराधम लोकालच्या महिला डब्यात शिरुन हस्तमैथुन करत होता, त्याच्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोकं यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
