पाकिस्तानकडे भारतापेक्षा दुप्पट अण्वस्त्र असतील असा अंदाज

पाकिस्तानकडे भारतापेक्षा दुप्पट अण्वस्त्र असतील असा अंदाज

अमेरिकेतील दोन थिंक टँकच्या माहितीनुसार येत्या 10 वर्षांमध्ये पाकिस्तानकडे भारतापेक्षा दुप्पट अण्वस्त्र असतील. रशिया आणि अमेरिकेच्या पाठोपाठ अण्वस्त्रांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक लागेल, असाही अंदाज रिपोर्टमध्ये व्यक्त केला आहे. कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पिस आणि स्टिम्सन सेंटर यांनी हा रिपोर्ट तयार केला आहे.

पाकिस्तान सध्या अण्वस्त्रांच्या यादीत अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीनच्याही मागे आहे. आजच्या घडीला पाकिस्तानकेड भारतापेक्षाही अधिक अण्वस्त्र आहेत.

येत्या 10 वर्षांमध्ये पाकिस्तानकडे 350 अण्वस्त्र असतील. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य पाकिस्तानकडे उपलब्ध आहे. आजच्या घडीला पाकिस्तानकडे 120 अण्वस्त्र आहेत, तर भारताकडे 80 ते 100 अण्वस्त्र आहेत. शिवाय, फ्रान्सकडे 300, चीनकडे 250, ब्रिटनकडे 225 अण्वस्त्र आहेत आणि अमेरिका व रशिया यांच्याकडे एकूण 1600 अण्वस्त्र आहेत.

रिपोर्टमधील माहितीनुसार, दरवर्षी 20 अण्वस्त्र तयार करण्याचं टार्गेट पाकिस्तानने ठेवले आहे. मात्र, पाकिस्तान वर्षाला केवळ 14 ते 27 अण्वस्त तयार करु शकते, असे तज्ञांचा म्हणणे आहे. भारत मात्र दरवर्षी केवळ दोन किंवा पाच अण्वस्त्र तयार करु शकतो.

 भारत अण्वस्त्रांच्या स्पर्धेत पाकिस्तानच्याही मागे आहे, कारण भारताने अण्वस्त्रांवर खर्च करण्याऐवजी लोकोपयोगी कामांवर पैसे खर्च करण्याला प्राधान्य दिलं आहे. भारत अण्वस्त्रांवर खर्च करत नाही, म्हणजे भारत कमकुवत आहे, असे नाही. तर भारत सैन्याला हयटेक बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *