देशात फाशीची शिक्षा हवी की नको या मुद्द्यावर विधी आयोगाच्या अहवालाने पडदा पडण्याची शक्यता आहे. देशातून फाशीची शिक्षा रद्द करुन फक्त दहशतवादी कृत्यांसाठीच फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी शिफारस विधी आयोगाने आपल्या अहवालात केल्याचं समजतं आहे.
न्यायाधीश ए. पी. शहा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने ही शिफारस केलेली आहे.
सध्या जगभरात भारतासह 58 देशांमधे फाशीची शिक्षा सुनावली जाते. त्यामुळे हा अहवाल सरकाला सोपवल्यानंतर यावर काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
