मोदींना धमकी देणाऱ्याची ओळख पटली

मोदींना धमकी देणाऱ्याची ओळख पटली

मथुरा येथील जाहीर सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाची ओळख पटली आहे. रामवीर असं या व्यक्तीचं नाव असून तो मथुरेतील नावली गावचा रहिवाशी आहे.

मथुरा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राकेश कुमार यांना पत्र आणि एसएमएस पाठवून रामवीर यानं मोदींना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला होता. अखेर या इसमाचा ठावठिकाणा पोलिसांना सापडला असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश कुमार यांनी दिली.

रामवीरनं खोट्या नावानं सीमकार्ड खरेदी केलं होतं. या कार्डच्या मदतीनं त्यानं एसएमएस केला होता. याआधीही त्यानं असे प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अटक केल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं राजेशकुमार यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *