औरंगाबादच्या वेदांतनगरमध्ये महागड्या गाड्या फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला बेड्या

औरंगाबाद शहरातील उच्चभ्रु वस्तीतील १७ महागड्या गाड्या फोडून लाखो रुपयांचं नुकसान करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी १२ तासाच्या आत मुसक्या आवळल्या. महागड्या गाड्या फोडून त्यातील लॅपटॉप, हार्डडिस्क, रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र वेगाने फिरवत आरोपींच्या शोधासाठी दोन पथक तयार केले होते. या पथकांनी १२ तासांच्या आत आरोपीला पकडलं.

पोलिसांनी २० वर्षीय आरोपीली पकडत त्याच्याकडून चोरीला गेलेला ५३ हजार ६०० रुपयांचा माल हस्तगत केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेदांतनगरमध्ये अलिशान गाड्या पार्किंगमध्ये होत्या. गुरूवारी मध्यरात्री २ ते ४ च्या सुमारास आरोपीने रांगेत उभ्या असलेल्या गाड्या फोडण्यास सुरुवात केली. गाडींच्या काचांवर मोठे दगड मारून नुकसान केलं. तसेच गाडीतून मुद्देमाल पळवून नेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *