सर्व पटेलांप्रमाणे राज्यातील पाटलांनी एकत्र यावं-नारायण राणे

सर्व पटेलांप्रमाणे राज्यातील पाटलांनी एकत्र यावं-नारायण राणे

‘गुजरातमधील सर्व पटेलांप्रमाणे राज्यातील पाटलांनी एकत्र यावं’, असं आवाहन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलं आहे. तसेच त्यांनी गुजरातमधील पटेल समाजाचेही कौतुक केले आहे. नारायण राणे हे सध्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

‘जसे पटेल एकत्र आले तसं पाटलांनी एकत्र यावं.’ असं म्हणत नारायण राणेंनी खास आपल्या शैलीत राज्यातील मराठा नेत्यांना चुचकारलं आहे. तर सध्या सत्तेमध्ये अनुभवहीन लोक आहेत अशीही टीका राणेंनी केली.

काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे,  खरीपाचे पीक शेतकऱ्याच्या घरात येईपर्यंत काँग्रेस शेतकऱ्याच्या बरोबर असेल असेही राणे म्हणाले. सरकारने लातूर, बीड आणि उस्मानाबादसाठी सरकारने विशेष पॅकेज देणं गरजेच आहे. तसेच कृत्रिम पावसावर खर्च करण्याऐवजी तेच पैसे चाऱ्यावर खर्च करण्याची गरज होती. असंही राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *