इंद्राणी मुखर्जींनी बहिणीची नव्हे तर चक्क मुलीची केली हत्या

इंद्राणी मुखर्जींनी बहिणीची नव्हे तर चक्क मुलीची केली हत्या

इंग्रजी वृृत्तवाहिनीत मोठ्या पदावर कार्यरत राहिलेल्या इंद्राणी मुखर्जी यांनी त्यांच्या बहिणीची नव्हे तर मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. शीना बोहरा ही इंद्राणी मुखर्जी यांच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती.

मुंबई पोलिसांनी मंगळवारी इंद्राणी मुखर्जी व त्यांचा चालक श्याम रॉय या दोघांना शीना बोहरा यांच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. तीन वर्षांपूर्वी शीना बोहरा यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. शीना यांचा मृतदेह रायगड येथे पुरण्यात आला होता. खार पोलिसांना एका खब-यामार्फत इंद्राणी यांचा ड्रायव्हर श्याम हा मोठ्या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती मिळाली व या गुन्ह्याला वाचा फुटली. पोलिसांनी श्यामची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. इंद्राणी यांचे पती पीटर मुखर्जी हे स्टार इंडियाचे सीईओ होते. पीटर व इंद्राणी यांचा हा दुसरा विवाह असून २००२ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले होते.

पोलिस चौकशीत इंद्राणी यांनी शीना बोहरा ही बहिण नव्हे तर मुलगी असल्याची माहिती दिली आहे. शीना ही इंद्राणी यांच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. हत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.  दरम्यान, कोलकाता पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी यांच्या पहिल्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *