मराठा आरक्षणासंबंधी विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार आहे. या विधेयकामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिकार मिळणार आहे. तसंच एससीबीसी प्रवर्ग ठरवण्याचे अधिकारही राज्यांना मिळणार आहेत. विधेयकात ३३८ ब आणि ३४२ अ या अंतर्गत काही दुरुस्त्या होणार आहेत. पेगासस हेरगिरी प्रकरण आणि तीन नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर विरोधकांचा संसदेत गदारोळ सुरू आहे. या गदारोळामुळे गेल्या १० ते १२ दिवसांत संसदेचं कामकाज विस्कळीत झालं आहे. विरोधकांच्या गदारोळातही सरकारने काही विधेयकं लोकसभेत मंजूर केली आहे. आता मराठा आरक्षणासंबंधी विधेयकही गदारोळतच मंजूर होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. यानंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ठाकरे सरकारने मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती.
