संजयला पुन्हा महिनाभर पॅरोल मंजूर

संजयला पुन्हा महिनाभर पॅरोल मंजूर

मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी तुरूंगवासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्तला पुन्हा ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. येत्या १-२ दिवसांत संजय पॅरोलवर बाहेर येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, संजयच्या मुलीच्या नाकावर शस्त्रक्रिया असून त्यावेळी कुटुंबियांसोबत उपस्थित राहता यावे यासाठी संजयने पॅरोलसाठी (संचित रजा) अर्ज केला होता.  प्रशासनाकडून तो अर्ज मंजूर झाला असून कायदेशीर बाबींची पूर्तता करून येत्या १-२ दिवसांत संजय तुरूंगाबाहेर येईल असे समजते.
९९३ च्या बाँबस्फोटांमध्ये बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच संजय सुमारे दीड वर्ष तुरुंगात होता त्यामुळे त्याला तीन वर्षांचीच शिक्षा भोगावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *