जव्हार हादरलं! अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार

जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी प्रकाश गणपत वळवी याच्यावर जव्हार पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदगाव येथील पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना प्रकाशने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. त्याच्यावर सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पूढील कार्यवाहीसाठी हा गुन्हा जव्हार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *