अलिबागमध्ये पोलिसाची आत्महत्या

अलिबाग येथे पोलीस नाईक प्रशांत ठाकूर (३५) याने शिवाजी नगर येथे आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रशांत याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.   प्रशांत ठाकूर हा अलिबाग पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून काम करीत होता. प्रशांत याची नुकतीच  डिव्ही कारवर चालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.  आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्री  दौरा असल्याने डिव्ही कारची चावी घेण्यासाठी पोलीस कर्मचारी हा प्रशांत याच्या घरी आला होता. त्यावेळी बराच वेळ फ्लॅटचा दरवाजा ठोठावला असताना प्रशांत याने दरवाजा उघडला नाही. अखेर आलेल्या पोलीस कर्मचारम्य़ाने अलिबाग पोलीस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडून आत गेले. त्यावेळी प्रशांत हा फ्लॅटमध्ये पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. प्रशांत याने आत्महत्या का केली याबाबत स्पष्ट कारण समजले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *