“उद्धव ठाकरेंकडे दिलीप कुमार यांच्या घरी जाण्यासाठी वेळ आहे, पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटायला नाही”

“उद्धव ठाकरेंकडे दिलीप कुमार यांच्या घरी जाण्यासाठी वेळ आहे, पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटायला नाही”

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं बुधवारी पहाटे निधन झालं. हिंदूजा रुग्णालयात सकाळी ७.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्यावर शासकीय इतमामात जुहू येथील दफनभूमीत दफन करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कलावंतांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांनी गर्दी केली होती. दरम्यान दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी राजकीय नेतेही त्यांच्या घरी पोहोचले होते. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंना स्वप्नील लोणकरच्या घऱी जाण्यासाठी वेळ नाही, मात्र तिथे जाण्यासाठी वेळ होता असं सांगत नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचं सांत्वन करतानाचा फोटोही शेअर केला आहे.

ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्र सरकारच्या अपयशामुळे मृत्यू झालेल्या स्वप्निल लोणकरच्या आईलाही ते भेटायला गेले असते अशी अपेक्षा. त्यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही, मात्र येथे जाण्यासाठी पूर्ण वेळ होता. दुख:द पण सत्य”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *