रिक्षाचालकाकडून तरूणीची छेडछाड

कल्याण पूर्वेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कल्याणमध्ये एका तरूणीला आणि दोन तरूणांना जमावाने बेदम मारहाण केली आहे. ही शुक्रवारी मध्यरात्री घटना घडली आहे.राहुल गडेकर आणि बंटी प्रधान असे मारहाण झालेल्या तरुणाची नावे आहेत. ते उल्हासनगर विभागात राहतात. शुक्रवारी मध्यरात्री त्यांची एक मैत्रीण रिक्षाने प्रवास करत होती . तेव्हा रिक्षाचालकाने तिची छेडछाड करु लागला. तिने फोनवरुन संबंधित माहिती तिच्या मित्रांना दिली. यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले.

मित्र घटनास्थळी पोहोचल्यानंतर रिक्षाचालक आणि तरूणीच्या मित्रांमध्ये वाद झाला. तेव्हा जमावाने दोन तरूणांसह तरूणीला देखील मारलं आहे. कल्याणमधील कोळसेवाडी पारिसरात काटेमानीवली नाक्यावर भररस्त्यात हा प्रकार घडला. मात्र याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *