जन्मदात्या बापानेच तीन मुलांना दिलं उंदिर मारण्याचं औषध

घरगुती भांडणाच्या वादातून राग अनावर झालेल्या वडिलांनी केलेलं कृत्य अतिशय धक्कादायक आहे. घरगुती वादात आपला राग अनावर झाल्यामुळे  वडिलांनी आपल्या तीन मुलांनाच विष देऊन जीवे मारण्याचा  धक्कादयक प्रकार घडला आहे. हा प्रकार मानखुर्द मध्ये घडला आहे. ( Father Try to Kill his three Childrens by Giving rat poison from Icecream )

धक्कादायक बाब म्हणजे जन्मदात्या पित्याने आयस्क्रीममधून आपल्या तीन मुलांना विष दिलं. या घटनेत अलिशान मोहम्मद अली अन्सारी या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. इतर दोन मुलं अलीना 7 वर्ष, अरमान 2 वर्ष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेनं मानखुर्द परिसरात एकच खळबळ माजली असून मुलांची आई नाजीया हिने दिलेल्या तक्रारीनुसार मानखुर्द पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाचे वडिल आरोपी मोहम्मद अली नौशाद अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मागिल काही दिवसात एका माजी पोलीस अधिकाऱ्याने आपल्या दोन मुलांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यातला एक मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर ही घटना बाप आणि मुलगा यांच्या नात्याला काळीमा फासणारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *