चाऱ्याविना तडफडून मेलेल्या जनावरांचं दु:ख असह्य, दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

चाऱ्याविना तडफडून मेलेल्या जनावरांचं दु:ख असह्य, दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं आपण ऐकलं असाल. मात्र, दुष्काळाची दाहकता एवढी वाढलीय की, जनावरं चाऱ्याविना तडफड़ून मृत्युमुखी पडत आहेत. आपल्या जनावरांचे तडफडून होणारे मृत्यू सहन न झाल्याने बीड जिल्ह्यातील दोन संवेदनशील तरुण शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्राच संपवली.

जीवापाड प्रेम करणाऱ्या या दोन शेतकऱ्यांची ही दुष्काळाची दाहकता आणि भयाण वास्तव सांगणारी ही कथा….

मराठवाड्यातला शेतकरी शेतात काही पिकलं नाही म्हणून मरण जवळ करायचा. आता तर या दुष्काळाची दाहकता एवढी वाढलीय की अंगणात बांधलेल्या गुरांना चारायचं काय, या प्रश्नाच्या विवंचनेत शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहेत. पाटोदा तालुक्यातील सरगवाडी इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी बीड जिल्हत्यातील चारा प्रश्न किती गंभीर आहे हेच अधोरेखित झालं आहे.

फोटोत Farmer Suicideदिसणारे  हे आहेत शेतकरी. ते आता या जगात नाहीत. हाताला काम नाही.. जनावराना चारा नाही, या परिस्थितीत बीड जिल्ह्यातील शेतकरी पडला आहे. हाताच्या फोडासारखं जपलेली गुरं डोळ्यादेखत चाऱ्याविना तडफड़ून मृत्युमुखी पडल्याने या शेतकऱ्याला धक्का सहन झाला नाही आणि याच नैरश्यातून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *