हिंदू युवतीसोबत दिसल्याने मुस्लिमाला मारहाण

मंगळूरजवळील एका गावातील हिंदू युवतीसोबत बाजारात दिसल्याने एका मुस्लिम युवकाला खांबाला बांधून एक तासभर मारहाण केल्याची आणि त्याचे कपडे उतरविल्याची घटना घडली आहे.
 
एका स्थानिक वृत्त वाहिनीवर या सर्व प्रकाराचे चित्रीकरण दाखविण्यात आल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, 14 जणांना अटक करण्यात आली आहे. मुस्लिम तरुणाला मारहाण करणारे हे सर्वजण बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. मारहाण झालेल्या युवकाचे मंगळूरमध्ये दुकान आहे. या मुस्लिम युवकाच्या दुकानातच हिंदू मुलगी काम करते. 
 
या मुस्लिम युवकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की या मुलीला दोन हजार रुपयांची गरज होती. त्यामुळे आम्ही दोघे मार्केटमधील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जात होतो. त्यावेळी तेथे आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मला शस्त्र व चाकुचा धाक दाखवून थेट मारहाण करण्यास सुरवात केली. ती युवती मला वाचविण्याचा प्रयत्न करत होती. पण, त्यांनी तिलाही थप्पड मारली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *