महाराष्ट्र पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी मोतीलाल नगर (Nagpur Sex Racket) येथील एका घरात सुरु असलेले सेक्स रॅकेट पकडले. त्यातून तीन अल्पवयीन मुली आणि एका महिलेला मुक्त केले गेले आहे. या मुलींकडून त्यांच्या संमती विना हे काम सक्तीने केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या मुलींचे अपहरण केल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या घरातून एका महिलेला अटकही केली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या एका फोटोग्राफरलाही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असेच सेक्स रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
वाठोडा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. महिला आणि अल्पवयीन मुलींची चौकशी केली जात आहे त्याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
7 मे ला बॉलिवूड फोटोग्राफर नासिर खानला ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नासिरने आपले नाव करण ठाकूर असे ठेवले. त्यानावेने तो हे सेक्स रॅकेट ऑनलाईन चालवत असल्याचे पोलिंसांच्या समोर आले आहे.
मुंबई क्राईम ब्रँचने या नागपूर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणातही ऑनलाईन बुकिंगचा अँगल समोर आला आहे. असा विश्वास आहे की, लॉकडाऊनमध्ये या मुली ऑनलाइन बुकिंगच्या मदतीने ग्राहकांना कॉल करत होत्या.
