84 वर्षांच्या आजीबाईंनी चोराशी केले दोन हात

84 वर्षांच्या आजीबाईंनी चोराशी केले दोन हात

पालघरमध्ये माहिम रोड येथील कंचनपुष्प इमारतीत राहणाऱ्या लक्ष्मीबाई यांच्या घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर गेलेली. शनिवारी दुपारी 3 वाजता त्या घरात एकटयाच असताना सोसायटीसमोर दबा धरुन बसलेला चोर अचानक त्यांच्या घरात शिरुन लाईटबिलची मागणी करु लागला. दरवाजा बंद करायच्या अगोदरच तो अचानक घरात शिरला.

घरात शिरुन लक्ष्मीबाईंच्या हाताला पकडत चोरट्याने त्यांना आत नेलं. बेडरुममध्ये कपाटात शोधाशोध केली तर त्याच्या हाती काहीच लागलं नाही. तेव्हा त्यांच्या हातातील बांगड्या फोडून एक सोन्याची बांगडी त्याने हिसकावून घेतली. तसेच गळ्यातील चैनही तो खेचून घेत होता. मात्र आजीबाईंचा प्रतिकार ही तितकाच तोडीचा होता.

वयोवृद्ध नागरिक दुपारच्या वेळी घरात एकटे-दुकटे असल्याचे पाहून घरात शिरणाऱ्या चोरांचा हल्ली सुळसुळाट झाला आहे. मात्र लक्ष्मीबाई आत्माराम पाटील या 84 वर्षांच्या आजीबाईंनी चक्क घरात शिरलेल्या चोराशी प्रतिकार करत मोठ्या चोरीपासून बचाव केला आहे.

शेवटी आजीचा आवेश पाहून, घरात आणखी काही शोधायचं सोडून त्या चोराने आजीबाईंच डोकं भिंतीला आपटलं आणि गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. आजीने केलेल्या प्रतिकारामुळे चोराला घरात जास्त वेळ फिरता आलं नाही. तरी त्याने 84 हजाराच्या दागिन्यावर डल्ला मारला, मात्र मोठी चोरी टळली.

चोर सोसायटीबाहेर रेकी करीत असतानाचे चित्र सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पालघर पोलिसांनी चोराचे रेखाचित्र सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून तयार करुन प्रत्येक ठिकाणी लावलं आहे. चोराला लवकरच पकडण्यात यश येईल असा आशावाद पालघर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *