नारायण राणे उद्यापासून मराठवाडा दौ-यावर

नारायण राणे उद्यापासून मराठवाडा दौ-यावर

मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे उद्या बुधवार, २६ ऑगस्टपासून २८ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांचा मराठवाडा दौरा करणार आहेत.

या दौ-यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांतील दुष्काळी गावांची पाहणी, शेतक-यांच्या भेटी, कार्यकर्त्यांचे मेळावे, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी, पत्रकार परिषदा असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.

२६ ऑगस्ट रोजी लातूर येथे सकाळी ११ वाजता या दौ-याची सुरुवात होणार आहे. पुढे २७ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद आणि २८ ऑगस्ट रोजी बीड असा हा दौरा आहे. या दौ-यांची जय्यत तयारी मराठवाडय़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *