पुरंदरे यांचे समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन भाजपमधील मराठा नेत्यांबद्दल संशय निर्माण करण्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुपारी घेतल्याचा घणाघाती आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
आव्हाड म्हणाले, ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन राज्य सरकारने पुरंदरे यांच्या खोट्या इतिहासावर शासनाचा अधिकृत शिक्का लावला आहे. राज्य सरकारने इतिहासाचे पुनर्लेखन करावे, अन्यथा शिवप्रेमींच्या मनातील द्वेष सर्वत्र पसरेल. त्यामुळे होणाऱ्या परिणमाला सरकार जबादार राहील असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, या कार्यक्रमाला पोलिसांनी आणि नगर पालिकेने परवानगी नाकरल्याने कार्यक्रमावर अनिश्चतेतेचे सावट पसरले होते. कुठला ही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. नाट्यगृह परिसराला दोरीचे कुंपण घालण्यात आले होते. आयोजकांनी ऐनवेळी भाग्यनगरातील मराठा सेवा संघ भवनात कार्यक्रम घेऊन पोलिसांना चकवा दिला.
