छत्तीसगडमधील रायपूरमध्ये रेल्वेतील एका तिकीट चेकरची महिलांनी जोरदार धुलाई केली. या तिकिट चेकरवर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका मुलीची छेड काढल्याचा आरोप आहे.
कोठीहून बिलासपूरकडं जाणाऱ्या एका एक्स्प्रेसच्या एसी डब्यातून एक मुलगी प्रवास करत होती. त्यावेळी या तिकीट चेकरनं आपल्या मोबाईलमधील अश्लिल व्हिडिओ संबंधित मुलीला दाखवण्यास सुरुवात केली. या मुलीनं तात्काळ ही बाब इतर प्रवाशांना सांगितली.
त्यानंतर डब्यातील महिलांनी या तिकीट चेकरची चांगलीच धुलाई केली आणि त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली केलं. दरम्यान, या तिकीट चेकरनं आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

