बंगळुरू-नांदेड एक्स्प्रेसला अपघात, मृतांमध्ये १ आमदारही

बंगळुरू-नांदेड एक्स्प्रेसला अपघात, मृतांमध्ये १ आमदारही

आंध्रप्रदेशातील अनंतपूरमध्ये बंगलोर-नांदेड एक्स्प्रेसला ट्रकने धडक दिली. या अपघातात ५ जण ठार झाले आहेत, यात कर्नाटकचे आमदार व्यंकटेश नायक यांचा देखील समावेश आहे. हा अपघात सकाळी २ वाजून १० मिनिटांनी झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या डब्यांना ट्रकने धडक दिल्याने अनेक डबे घसरले. या अपघातात २५ जण जखमी आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पहाटे अंधार असल्याने बचाव कार्यात अडथडे येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *