आम आदमी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने अमरावती कलेक्टर ऑफिसमधील शिपायाच्या गालाला चावला घटना समोर आली आहे. कलेक्टरच्या चेंबरमध्ये घुसू न दिल्याने संतापलेल्या सुभाष देशमुख याने थेट शिपायाच्याच गालाचा चाव घेतला.
गेले काही दिवस अमरावतीलमधील तहसीलदार कार्यालयासमोर आम आदमी पक्षाकडून आंदोलन सुरु होते. या संदर्भातच कलेक्टरची भेट घेण्यासाठी सुभाष देशमुख कलेक्टरच्या चेंबरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी ड्युटीवर असणारे शिपाई गोविंद चव्हाण यांनी त्यांना रोखले. कलेक्टर अजून आलेले नसून तुम्हांला चेंबरमध्ये जाता येणार नाही असंही चव्हाण यांनी सुभाष देशमुखांना सांगितले.
यावरुन बराच वादही झाल आणि दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. याचवेळी संतापलेल्या सुभाष देशमुख यांनी संतापून गोविंद चव्हाण यांच्या गालाचा जोरदार चावा घेतला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून सुभाष देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.
