तरुणीच्या नावे बनावट फेसबुक अकांऊट

एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन तिच्या नावानं इतर मुलांशी चॅट करुन बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यात उघडकीस आला आहे. असून घटनेतील मुलगी व आरोपी मुलगा दोन्ही अल्पवयीन असून रात्री उशिरा आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या वर्ग मैत्रिणीच्या नावानं एका मुलानं तीन महिन्यांपूर्वी बनावट फेसबुक अकाउंट तयार केलं. तब्बल २०० हून अधिक मित्र जोडले. रोज अनेकांना मेसेज पाठवून चॅटिंग करीत होता. १४ ऑगस्टला सदर तरुणी काही कामानिमित्त सेतू कार्यालयात आली असताना तेथेच असलेल्या एकानं तिला रात्री तू फेसबुक वर खूप गप्पा मारल्याच सांगितलं. मात्र सदर मुलीला याबाबत कुठलीही माहिती नसल्यान दोघांमध्ये वाद झाला व यातूनच हा सगळा प्रकार समोर आला.

याबाबत पालकांना माहिती दिल्यानंतर काल आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *