उपवासाला केला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ म्हणजे शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा.
या ढोकळ्यासाठी शिंगाड्याचे पीठ, दाण्याचे कूट, आंबट ताक, मीठ, मिरची, आले, जिरे, खायचा सोडा आदी साहित्य लागते. ढोकळ्यासाठी सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून ठेवावे. २- ३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या, आले, थोडेसे जिरे आणि सोडा घालून हाताने चांगले ढवळून घ्यावे. नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तुपाचा हात लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये वाफवून घ्यावे. जरा निवल्यानंतर वड्या कापाव्यात. वर थोडेसे ओले खोबरे व कोथिंबीर घालावे. ते चवीलाछान लागते. हा ढोकळा फार सुंदर लागतो.

