श्रृती कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी 2 पोलीस कर्मचारी निलंबित

श्रृती कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी 2 पोलीस कर्मचारी निलंबित

श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय. औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सिडको पोलीस स्टेशनचे एएसआय राजू वैष्णव आणि जमादार हिवाळे यांचं निलंबन केलंय.

छेडछाडीला वैतागूनऔरंगाबादच्या श्रुती कुलकर्णीनं आपलं आयुष्य संपवलं. श्रुती ही 22 वर्षांची एमबीएची विद्यार्थीनी होती. स्वप्नील मणियार या तरुणाचं श्रुतीवर एकतर्फी प्रेम होतं. स्वप्नील श्रुतीसोबत पदवीपर्यंत कॉलेजला होता. श्रुतीने त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण स्वप्नील तिची छेडछाड करायचा, अश्लील मेसेज पाठवायचा, पैशाचं आमिष दाखवून तिच्यावर लग्न कर म्हणून जबरदस्तीही करायचा. अखेर या जाचाला कंटाळून श्रुतीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. श्रुतीनं याबद्दल घरच्यांना सांगितलं होतं. तिने आणि तिच्या कुटुंबियांनी याबद्दल पोलिसांकडे तक्रारही केली होती. पण पोलिसांनी या स्वप्निलवर छेडछाडीची गंभीर कलमं लावली नाहीत आणि तो जामिनावर सुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *