कराडजवळ दोन मोटारींचा भीषण अपघात; पुण्यातील तीन पैलवानांचा जागीच मृत्यू

कराडजवळ दोन मोटारींचा भीषण अपघात; पुण्यातील तीन पैलवानांचा जागीच मृत्यू

पुणे-बंगळूरु महामार्गावर कराडजवळ दोन मोटारींमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पुण्यातील तीन पैलवानांचा समावेश आहे. हे तिघेही कात्रज परिसरातील रहिवासी असल्याचे सुत्रांकडून कळते.

कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या दोन मोटारींमध्ये हा भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महामार्गावर कराड जवळच्या आटके टप्पा येथे हा अपघात झाला असून अपघातग्रस्त एक मोटार कोल्हापूरवरुन पुण्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या मोटारीने पुढे असणाऱ्या मोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पुढील मोटार पलटी झाली.

या भीषण अपघातात दोन्ही मोटारीतील मिळून चार जण ठार झाले आहेत. यातील जखमींना कराडच्या कृष्णा हॅास्पिटल येथे दाखल करणात आले आहे. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरु करण्यात आले आहेत. घटनास्थळी महामार्ग पोलीस तसेच कराड पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *