रायगडावरील तिकीटघराचा शिवभक्तांकडून कडेलोट

रायगड किल्ल्यावरील तिकीटघराचा शिवभक्तांनी कडेलोट केला आहे. पुरातत्व विभागाची तिकीट खिडकी शिवभक्तांनी हटवली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषदेखील करण्यात आला. कराच्या नावे जबरदस्ती पैशांची लूट केली जात असल्याचा शिवभक्तांचा आरोप आहे. यावेळी शिवसैनिक आणि महाडचे आमदार भरत गोगावले उपस्थित होते.

रायगडाच्या चित्त दरवाजाजवळ पुरातत्व विभागाने तिकीट घर उभारलं होतं. पुरातत्व विभागाकडून करवसुली करण्यात येत होती. रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना २५ रुपये मोजावे लागत होते. मात्र कर भरुनही गडावर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने शिवभक्त संतापले. त्यामुळे आमदार भरत गोगावले आणि कोकणकडा मित्र मंडळाने मिळून हे तिकीटघर हटवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *