भिवंडीत गोदाम कोसळले; ७ मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

भिवंडीतील मानकोली परिसरातील हरीहर कम्पाउंडमधील गोदाम कोसळलं आहे. सोमवारी सकाळी १०.२५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्राथमिक वृत्तानुसार ढिगाऱ्याखाली सात मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच अग्निशमनचे तीन बंब घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्य तातडीनं सुरु करण्यात आलं आहे.

याशिवाय, ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे अग्निशमन केंद्र आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकाला (टीडीआरएफ) मदत आणि बचावकार्यासाठी रवाना करण्यात आले आहे. तसेच घटनेचं गांभीर्य पाहून एनडीआरएफ पथकालाही पाचारण करण्यात आलेय.

भिवंडीतील मानकोलीमधील हरीहर कम्पाउंडमधील प्लॉट क्रमांक ए – ८ येथील तळ अधिक एक मजली गोदाम सकाळी अचानक कोसळले. त्यामुळे तेथे काम करणारे सात ते आठ मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य वेगानं सुरु आहे. या दुर्देवी घटनेत अद्याप कोणाची मृत्यू झाल्याचं वृत्त नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *