अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलरट्यून हटवण्याची मागणी

अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलरट्यून हटवण्याची मागणी

कोरोना व्हायरसचा धोका अद्याप कमी झालेला नाही. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारकडून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच प्रयत्न केला जात आहे. मास्क वापरण्याचा आणि सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला दिला जात आहे. देशात लॉकडाउन होत असल्याने लोकांना कोरोनाची जाणीव करुन देण्यासाठी प्रत्येक फोनवर कॉलर ट्यून ऐकवला जात आहे.अमिताभ बच्चन यांच्या आवाजात सध्या सुरु असलेली कोरोना कॉलर ट्यून हटवावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

कोरोना संक्रमण कालावधीत, लोकांना जागरूक करण्यासाठी आणि या साथीला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. फोनवर ऐकलेला कॉलर ट्यूनसुद्धा बदलली होती. सुरुवातीला ही कॉलर ट्यून देशभरातील लोकांना हा साथीचा रोग टाळण्यासाठी आणि या आजाराशी लढाई टाळण्यासाठी संदेश देत होती. त्यानंतर ही कॉलर ट्युट अनलॉकच्या मेसेजमध्ये बदलली गेली. बरेच दिवस, लोक फोनवर अनलॉक प्रक्रियेचा मेसेज आणि कोरोनापासून बचाव असं ऐकत होते. त्यानंतर या कॉलर ट्युनद्वारे अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने कोरोनाबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *